प्राचीन काळी सोन्याची व चांदीची नाणी का असायची?

भौगोलिक, प्राकृतिक, सांस्कृतिक आणि सामाजिक गरजा यातुन विनिमय साधने आणि प्रणाली उदयास आल्या.

प्रामुख्याने प्राचीन काळात विकास हि संकल्पना फारच हळूहळू विस्तारु लागली. अष्मयुगात मर्यादित जीवनशैली होती. गरजांचे प्रमाण संघटित स्वरूपाचे नव्हते. थोडक्यात खा, प्या आणि झोपा. कच्चे मांस, कंदमुळे खाऊन जगणारा मानव आगीच्या अविष्कारातून कल्पक बनत गेला अन् प्रगतीला चालना मिळत गेली. गरजा वाढू लागल्या, गरज हि शोधाची जननी आहे याची प्रचिती खऱ्या अर्थाने आली. प्राचीन काळापासून कालानुरूप बदलत गेलेल्या प्रणाली आपण पाहू.

वस्तू विनिमय- एका विशिष्ट वस्तूच्या बदल्यात दुसऱ्या वस्तूची देवाण घेवाण केली जात असे त्याला वस्तू विनिमय असे म्हणता येईल. सुरवातीच्या काळात केवळ कृषी व्यवसाय, पशुपालन, मत्स्यव्यवसाय यासारखे प्राथमिक व्यवसाय चालत .थोडक्यात परावलंबी प्रणाली होती. एखाद्याच्या शेतात काम करून त्या बदल्यात धान्य दिले जाई पण जर धान्याचं योग्य प्रमाणात उत्पादन झालं नाही तर मग व्यवहार तोट्यात जायचा. शेतातील चारा पशुव्यवसायिकाला देऊन त्या बदल्यात दूध, मांस, अंडी घेतली जात होती. पण हि प्रणाली संबंधितातील विश्वास आणि सामंजस्यावर अवलंबून होती. बहुतेक वेळा यात कोणत्यातरी एका पक्षाचा तोटा व्हायचा. परिणामी संबंध बिघडायचे. म्हणजे एकंदरीत व्यवहार हा अचल होता. भौगिलीकतेवर अवलंबून होता.

मुद्रा विनिमय- वस्तू विनिमयातील त्रुटींमुळे मुद्रा विनिमय हा प्रकार उदयास आला. प्राचीन इतिहास हा राजाभिमुख होता. राजा बहुतांश वेळा आपली स्वतःची प्रतिमा, मानत असलेल्या देवदेवतांच्या प्रतिमा किंवा काही राजाची स्तुती करणारी सुभाषिते काही ठराविक धातूंच्या नाण्यावर मुद्रित करत असतं. त्यायोगे राज्याची व्यापकता दर्शवली जाई. नाण्यांचा वापर केला जाण्याचे मुख्य कारण म्हणजे युद्धजन्य परीस्थिती.. कारण युद्धे हि अनिश्चित कालावधीसाठी होतं असतं. हार, जीत, माघार किंवा तह ह्याच परिणामांतून युद्ध थांबत असे. रामशेज किल्ला, नाशिक हा लढा तर चक्क सहा वर्षे चालला होता. सोबत आणलेला धान्यसाठा संपत असे. अश्या प्रसंगी सैनिकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी लागे. तहात अथवा शरणागती पत्करली तर समोरच्या राजाने ठेवलेल्या अटी मान्य करणे क्रमप्राप्त होते. उदा. उंबरखिंडीच्या शरणागतीवेळी उद्धवस्त केलेल्या गावांची कारतलबखानाला सर्व नुकसान भरपाई करून स्वतःचा जीव वाचवावा लागला होता.

तसेच व्यापाराच्या माध्यमातून राजाची कीर्ती पसरवली जात होती. अश्यावेळी योग्य मोबदला ठरवण्यासाठी नाण्यांचा धातू प्रकार अन् वजन यावरून मुद्रामूल्य ठरवले जाई. म्हणून संमिश्र धातू, कासे, तांबे, चांदी, सोने वापरू लागले. मूल्याचं योग्य मापन करता येत होतं. फार काळ टिकत असल्यामुळे धनसंचय करून प्रासंगिक वेळी वापरता येणे शक्य झालं होतं. नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीचा फारसा परिणाम होतं नव्हता. एका जागेवरून दुसऱ्या जागी वाहून नेता येत होते. अश्या कारणांमुळे नाण्यांचा वापर हा सर्रासपणे केला जाऊ लागला.

वित्त विनिमय प्रणाली- राजेशाही हळूहळू नष्ट होऊन देशपातळीवर राज्यप्रणाली अवलंबल्या गेल्या. त्या त्या संबंधित देशांनी स्वतःची स्वतंत्र वित्त प्रणाली निर्माण केली. नाणी अन् कागदी चलनातून व्यवहार होऊ लागले. नाण्याच्या तुलनेत कागदी चलन जास्त होऊ लागला. गृहसंस्था, बँका यासारख्या संकल्पना पसरू लागल्या. आता तर हळूहळू नगदविरहित व्यवहार वाढू लागले आहेत. उदा. Google pay, Phone pay, Paytm इत्यादी.

•••••••••••••••••••••••••••••••••√•••••••••••••••••••••••••••••••••••••••

सोन व चांदी हे खुप प्राचीन काळा पासून मौल्यवान धातू समजला जातो. म्हणून खरेदी विक्री करता याचा वापर केला जाई तसचे तांबे या धातू चाही उपयोग होई. केवळ व्यापाऱ्यांना या धातूंच्या शुद्धते शी मतलब असे त्यावरील चिन्ह ही त्यांच्या राजघराणी वैगरे साठी साठीची असली तरी व्यापारी पूर्वा पार चालत आल्याच ओळखीच्या नाणीं च स्वीकारत असत .एक किलो सोन चांदी किंवा तांब्याची वस्तू ची किंमत ही त्याच वजनाच्या नाण्याहून थोडी कमी असे ती या साठी की तुम्ही अमुक एक वजनाचा धातू घरून नेऊन सरकारी टाकसाळ मधून त्याची बनवण्याच्या ठराविक मेहेनताना देऊन आपण ही नाणी बनवू शकत असत व आपणास आपल्या वस्तूचे चलनात रूपांतर करता येत असे .

इंग्रज अधिकारी जे राजांना भेटायला आले होते की आमचे चलन तुमच्या राज्यात स्वीकारण्याचा व्यापाऱ्यांना हुकूम काढा म्हणून त्या मागे कारण हेच होते.टॉवर ऑफ लंडन येथे त्यांनी पाडलेली नाणी भारतात कोणी ही व्यापारी स्वीकारत नव्हते कारण त्यावरील त्या काळी अनोळखी असलेली इंग्रजी भाषा व त्याहून अनोळखी इंग्रज राजाचे चिन्ह या मुळे नाण्याच्या धातू च्या शुद्धतेची शंका निर्माण झाली होती राजांनी यावर जर व्यापाऱ्यांना शुद्धतेची खात्री पटली तर ते स्वीकारतील या बाबत ते कोणत्याही प्रकारची सक्ती करणार नाहीत असे स्पष्ट केले,सर्वत्र चालणारी फारसी मुगल नाणीं बनवून घेताना इंग्रज अधिकारी बरी च लाचलुचपत व अडवणूक णी हैराण झाले होते.असो

कागदाचा चलन म्हणून चीन मध्ये प्रथम वापर झाला तो पर्यंत जग भर धातूचे तुकडेच नाण्याच्या स्वरूपात चलन म्हणून वापर होत.सोन चांदी वैगरे धातू पूर्वीही खूप दुर्मिळ होते व आजही ही दुर्मिळच आहेत किमान आज गरीबाच्या घरी भांडीकुंडी तरी धातूची असतात पूर्वी केवळ गाडगी मडकीच असायची .जुन्या सर्व पिंडीवर नाग कोरलेला दिसतो कारण धातूचा नाग बनवणे खूपच खर्चिक काम असे मात्र हल्ली सर्रास तांब्या पितळेचे नाग दिसतात व पिंडीवर कोरलेलं नाग दिसत नाहीत.

•••••••••••••••••••••••••••••••••√•••••••••••••••••••••••••••••••••••••••

खूप पुर्वी देवाण घेवाण पद्धत होती. म्हणजे एखाद्याने गहू दिला तर त्याला तांदूळ देणार. धान्याच्या बदल्यात बांगड्या भरणार इत्यादी जी आजही खूप कमी प्रमाणात का होईना चालू आहे ज्याला barter system म्हणतात.

नंतर मोती,विशिष्ट दगड कवड्या असे प्रकार आले.

"कवडी एक अर्पीता देसी हार मुक्ताफळा हो" ही ओळ आजही नवरात्रीच्या आरतीत आहे.

नंतर महत्व आले ते तांबे,सोने,चांदी या धातूंना. शेरशहा सूरी याने केलेला रूपया आजही भरपूर फरकांसह भारत,पाकिस्तान,इंडोनेशिया अशा देशांच मुख्य चलन आहे.

पुर्वी नाणी घडवण्यासाठी सरकारने (मोगल,रजपूत,मराठा इत्यादी) सराफांना नेमले होते. कर्ज देण्याचे काम अजूनही भरपूर भागात सोनार लोक करतात. पेशव्यांनी,मोगलांनी सोनारांकडून घेतलेली कर्ज प्रसिद्ध आहेत. सोने,चांदीच्या प्रमाणावर वर सोनार विनीमय दर ठरवीत. अगदी पूर्वीपासून चालत आलेली पेशवाई पर्यंतची नाणी 1920 मध्ये इंग्रजांनी रद्द करत ब्रिटिश नाणी वापरायची सक्ती केली.

Comments