शिवकाळात सोन्याचा 'होन' चांदीची'लारी' व तांब्याची 'शिवराई' ही प्रमुख नाणी आढळतात.

महाराष्ट्रात शिवकाळाच्या पूर्वार्धात मराठय़ांचा राज्यविस्तार कोकण प्रांतात अधिक होता. ‘लारी’ हे चांदीचे नाणेही चलनात होते. म्हणूनच शिवकाळात सोन्याचा ‘होन’, चांदीची ‘लारी’ व तांब्याची ‘शिवराई’ ही प्रमुख नाणी आढळतात.

जुन्या नाण्यांचा अभ्यास करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर अंजनेरी येथे ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ न्यूमिस्मॅटिक स्टडीज’ ही संस्था आहे. या संस्थेत विविध काळांतील राजांच्या तीन हजार नाण्यांचे संग्रहालय, सुसज्ज ग्रंथालय, नाणी-लिपी आहेत.

नाणी इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण साधन आहे. नाण्यांच्या अभ्यासातून तत्कालीन अर्थव्यवस्था, राजकीय परिस्थिती, समाज, धार्मिक चालीरीती, तंत्रज्ञान, व्यापार, कला या सर्वांची माहिती मिळते. लिपीचा विकास, राजांची नावे व वंशावळ, वजन व मापन पद्धती यांबाबतदेखील अधिकृत माहिती मिळते.

Comments