आपल्या संग्रहामध्ये काही रोचक नाणी आहेत का?

वाटायला जरा विचित्र किंवा वेगळे वाटेल परंतु माझ्याकडे साधारण 1970 ते 1980 या काळात चलनात असलेली काही नाणी जपून ठेवली आहेत.

या नाण्याची जपून का ठेवली याला एक छोटासा प्रसंग जोडलेला आहे त्यामुळे ही नाणी मी जमवली होती.

एकदा काही कामाने कॉलेज मध्ये असताना मी माझ्या आत्या कडे गेलो. तर तिने एक भाषण दिले सगळ्यांना .. ते असे .. दोन पैसे राखून ठेवावेत तेच अडी अडचणीला कामी येतील इत्यादि.. आता ती नाही.

पण मी बस नि गेलो होतो बस माघे तिकीट होते 15 पैसे पण मी ठरवून चिल्लर दिली नाही.. हॉस्टेल ला जाऊन सर्व चिल्लर मोजली या 1, 2 ,3पैश्याची नाणी वेगळी केली मग एक छोटा डबा तयार केला आणि त्यात बाहेरून आल्यावर ह्या नाण्यांचा संग्रह सुरू केला अनेक वर्षे म्हणजे 72 ते 77 च्या काळात ही मिळतील तेवढी जमा केली.

आज या नाण्यांना काही किंमत नाही पण माझ्या कडे साधारण पणे 1 रु 50 पै इतकी नाणी आहेत ही नाणी आजही आहेत पण ती नागपूरच्या घरी असल्यानी त्यांची चित्रं देत येणार नाहीत. म्हणून शोध घेतला तर snapdeal वर हे संग्रह विकायला हे आहेत पाहून आश्चर्य वाटले .

काही फोटो गूगल आणि स्नॅपडील च्या शिते वरून घेतले आहेत इथे ..

  • आज incometax चा रिटर्न भरताना nearest 10 रु ला roundof करतात .
  • आणि सगळीकडे बिल असेल तर कमीत कमी एक रु लाच मोजतात पूर्वी ऑटो चे बिल बंगलोर ला मी 1 ते 5 रु पर्यंतच दिल्याचे आठवते असो ..
  • एके काळी 1 2 3 पैसे नाणी रुपात चलनात होते ते दिवस पाहिले आहेत काही माझ्याहूनही वयस्कर मंडळी असतील त्यांना 60 च्या दशकातील 1 पै तांब्याचा किंवा एक आणा आठवत असेल . त्या आधी देखील नाणी होती चलनात.
  • त्याकाळी 64 पैश्याचा एक रुपया होता . हे बदलले 1960 साली मग 100 पैसे चा एक रुपया झाला.
  • हे सगळे दशमान पद्धती सुरू झाली तेंव्हा बदलले हे पण आम्हाला शाळेत शिकवलेले आठवते आहे.

Comments